सना खान हत्या प्रकरणी मोबाईल जप्त

0

नागपूर NAGPUR  : भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अमित साहू याच्या घरुन पोलिसांना एक मोबाईल फोन व लॅपटॉप जप्त करण्यात यश आले आहे. (Sana Khan Murder Case)
आरोपी अमित साहूच्या आईच्या घरातून हे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहूची ‘पोलिग्राफ टेस्ट’ आणि ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ करण्याचे ठरवले असून त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. भाजप पदाधिकारी सना खान काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील जबलपूरला जाऊन बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर अमित साहू नावाच्या त्यांच्या मित्रानेच त्यांची हत्या केल्याचे समोर आले होते. मात्र आजवर सना खान यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सना खान यांचा मोबाईल फोनही पोलिसांना मिळालेला नव्हता.