ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना आमदार समीर मेघे यांच्या हस्ते मोबाईल भेट!

0

नागपूर (NAGPUR), 21 मे 2025: महावितरणच्या ‘लकी डिजिटल ग्राहक योजने’ अंतर्गत सलग तीन महिने ऑनलाईन पद्धतीने वीज बिलांचा भरणा करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना आमदार समीर मेघे यांच्या हस्ते मोबाईल फोन आणि स्मार्ट वॉचचे वाटप करण्यात आले. वाडी उपविभागातील विजेत्या ग्राहकांना ही बक्षिसे प्रदान करण्यात आली.

वीज ग्राहकांना ऑनलाईन पेमेंटसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महावितरणने ही अभिनव योजना सुरू केली आहे. वानाडोंगरी येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियाना’ प्रसंगी या योजनेतील विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. आमदार समीर मेघे यांच्या हस्ते विजेत्यांना मोबाईल फोन व स्मार्ट वॉच देऊन गौरवण्यात आले.

या प्रसंगी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र रंधे यांच्यासह महावितरणचे अभियंते, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विजेते ग्राहक व शिबिरार्थी उपस्थित होते.

फोटो ओळ: महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करताना आमदार समीर मेघे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर