‘या शहरात’ मतदारसंघाच्या निवडणुकीतून मनसेचा माघार

0

मुंबई(Mumbai) 7 जून:- कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे यांनी कोकण पदवीधरची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाकडून अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर देखील करण्यात आली होती. त्यानंतर मनसे विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीतून मनसेने माघार घेतली.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपचे निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड सकाळीच शिवतिर्थावर राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी पोहचले होते. अखेर प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे यांना राज ठाकरेंची मनधरणी करण्यात यश आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला (Raj Thackeray decided to withdraw)

भाजपकडून निरंजन डावखरे(Niranjan Dawkhare) रिंगणात आहेत. डावखरे हे मागच्या दोन टर्मपासून कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार आहेत. डावखरे यांच्यासाठी मनसेने माघार घेतली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेत आहोत, असे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.

महायुती एकत्र राहील असा विश्वास आहे. बरेच वर्षाचे संबंध आहेत. मी राज ठाकरे यांचा आशिर्वाद घ्यायला आलो होतो, असे निरंजन डावखरे म्हणाले.