

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप लावले आहेत. शरद पवार गटातील नेत्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम सुरु असून ‘सही करा अन्यथा अमुक काम होणार नाही’ असे त्यांना बजावले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. (NCP Leader Rohit Pawar)
शरद पवार गटातील आणखी एक आमदार आणि खासदार अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी हा गंभीर आरोप केला आहे. त्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, अजित पवार गटात खरेच नाव दिले आहे का, हे बघावे लागेल. आमदारांचे एखादे महत्त्वाे काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय होत नसल्याच्या घटना घडत आहे. ब्लॅकमेल करून सह्या घेतल्या जात आहेत. तु सही कर नाहीतर काम होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितल जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.