आमदाराने घेतली ‘या’ आश्रमशाळेची सहविचार सभा

0

विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांची प्रकरणे निकाली काढावी

आमदार सुधाकर अडबाले (MLA Sudhakar Adabale) यांनी घेतली विजाभज आश्रमशाळेची सहविचार सभा

नागपूर (NAGPUR) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत संचालित अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम “समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा” अंतर्गत सहविचार सभा आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत नागपूर प्रादेशिक उपसंचालक विजय वाकूलकर व विभागातील सर्व जिल्ह्यांचे सहाय्यक संचालक यांच्यासोबत १२ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन नागपूर येथे पार पडली. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे तात्‍काळ निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिल्‍या.

सभेत नियमित वेतनाबाबत गंभीरपणे चर्चा करण्यात आली असून यानंतर वेतन विनाविलंब करण्यात यावे,जेष्ठता सूची पाहूनच शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात यावेत, शिक्षकांचे समायोजन समुपदेशन पद्धतीने घेण्यात यावेत, भनिनि परतावा व ना-परतावा बी.डी.एस. तात्काळ सुरू करण्यात यावे, अनुकंपा धारकांचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ/निवड श्रेणी मंजुरीकरिता विभागात दर आठवड्याला समितीची सभा घेऊन नियमानुसार ४५ दिवसाच्या आत मार्गी लावण्यात यावे, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव एका आठवड्यात निकाली काढावे या व इतर सर्व समस्‍यांवर चर्चा तथा सूचना करण्यात आल्या.

यावेळी नागपूर सहाय्यक संचालक धनराज सहारे, चंद्रपूर सहाय्यक संचालक श्रीमती आशा कवाडे, गोंदिया सहा. संचालक विनोद मोहतुरे, गडचिरोली सहा. संचालक श्री. मडावी, नागपूर समाज कल्‍याण अधिकारी श्री. भोयर, विमाशि संघ आश्रमशाळा विभागाचे जिल्‍हा कार्यवाह किशोर नगराळे, जिल्‍हाध्यक्ष दिनेश चौधरी, वनकर सर, बोरकर सर, गडचिरोली जिल्ह्याचे पदाधिकारी दुधबावरे सर तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, प्रांतीय कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार, नागपूर महानगर अध्यक्ष विठ्ठल जूनघरी, जिल्‍हा कार्यवाह संजय वारकर, महानगर कार्यवाह अविनाश बढे, कर्णबोधी मांडवे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकार, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, सुर्यकांत केंद्रे, रणजीत राठोड व समस्‍याग्रस्‍त आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.