
नवी दिल्ली NEWS DELHI -राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीनंतर Sharad Pawar शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या तसेच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाकडून दाखल आमदार अपात्रता प्रकरणाच्या याचिकांवरील एकत्रित सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणीचे नवे वेळापत्रक (Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar) सादर करण्याची शक्यता असून न्यायालयाकडून त्यावर नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेले आहे.
मागील सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना अत्यंत कठोर शब्दांत खडसावले होते. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी सॉलिस्टर जनरल यांच्यासह चर्चा करावी आणि सुधारीत वेळापत्रक द्यावे, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणी नवे वेळापत्रक सादर करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणाचे सादर केलेले वेळापत्रक सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.