पोस्टर अंगावर चिटकवून आमदार धंगेकर विधीमंडळात

0

 

ललित पाटीलच्या पाठिराख्यांवर कारवाईची मागणी

नागपूर, 07 डिसेंबर  : ड्रग्ज तस्कर ललित पाटील   याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई करण्यात यावी असा मजकूर लिहीलेले पोस्टर अंगावर चिटकवून पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर विधान भवन परिसरात आले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या या प्रकाराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

पुण्यातील ससून रुग्णालतून आरोपी ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले होते. ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेऊन आता चौकशी सुरू केली आहे. आमदार रविंद्र धंगेकर यांनी विधान भवन परिसरात ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा मागणी केली आहे. यासंदर्भात आ. रविंद्र धंगेकर म्हणाले की, ललित पाटील या आरोपीने ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज रॅकेट चालवले आहे. याबाबत आम्ही कारवाईची मागणी केली आहे. ललित पाटील याला 9 महिने चांगली सेवा दिली. पोलीस, डॉक्टरांशी संगनमत ठेवून त्याने अवैध धंदा सुरू ठेवला. यात त्याने करोडो रुपयांचा व्यवहार केला. आम्ही आवाज उठवूनही संजीव ठाकूर यांना अटक केलेली नाही, संजीव ठाकूर यांना अटक झाल्यानंतर ज्या, ज्या मंत्र्यांनी फोन केला त्याचा तपास झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली.