

अमरावती Amrawati : आपण मंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केली होती. मात्र, काही मिनिटातच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या फोनचा दाखला देत घुमजाव केले. आमदार कडू म्हणाले की, मी आजच मंत्रीपदावर दावा सोडणार होते. तसे जाहीर करण्याचा निर्णयही घेतला होता. पण,He said that the decision was delayed after the Chief Minister called and requested him not to drop the claim. Kadu said that the Chief Minister had invited him to meet on 17th and take a decision on July 18. मुख्यमंत्र्यांनी फोन करून दावा न सोडण्याची विनंती केल्याने हा निर्णय लांबणीवर टाकल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मला भेटून निर्णय घे असे सांगत १७ ला भेटायला बोलावले असू १८ जुलैला यासंदर्भात निर्णय घेऊ, असे कडू यांनी सांगितले.
सत्ता पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. लोकांची यामागे पाहण्याची भूमिका विचित्र आहे. याला स्थिरता यायला पाहिजे. लोक आमच्यावर आरोप तसेच आमचे चारित्र्यहनन करीत आहेत. यापुढे आम्ही दिव्यांगांसाठी शहीदांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. त्यामुळे मंत्रीपदाचा दावा आम्ही सोडणार असल्याचा निर्णय घेणार होतो. पण आता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, तू आज हा निर्णय घेऊ नकोस मी भेटल्यानंतर याबाबत निर्णय घे. त्यामुळं १७ जुलै रोजी आमची भेट होईल, त्यानंतर १८ जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असे आमदार कडू म्हणाले.