
(Amravti)अमरावती– 22 जानेवारीला संपूर्ण देशामध्ये दिवाळी आणि गुढीपाडवा पेक्षाही मोठी तयारी केली जात आहे. घरासमोर दिवे लावून घरांवर गुढ्या उभारणार आहेत.अशा वेळेस या बेताल वक्तव्यातून काय फायदा मिळणार आहे? संपूर्ण देशभर याचा निषेध सुरु असल्याचे (Guardian Minister Chandrakantada Patil) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, (MLA Bachu Kadu)आमदार बच्चू कडू आमचे असे मित्र आहे की, मनात आले तर लगेचं बोलून टाकतात. याचा अर्थ ते बाहेर पडतील, किती लोकसभा लढतील? असं नाही. असं विरोधकांचं मनातले मांडे खाणं चालू आहे. मात्र त्यांना प्रत्यक्षात मांडे खायला मिळणारच नाहीत यावर चंद्रकांत पाटील यांनी भर दिला.