
बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी बाहेर काढले
Uttarakhand : उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बांधकामाधीन बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी बाहेर काढण्यात बचावपथकांना यश आलं आहे.
या बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबरला कोसळला. बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे ६० मीटरचा भाग खचल्याने ४१ कामगार अडकले होते. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर भागात हे कामगार अडकले होते.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्हि. के. सिंह यांनी सुटलेल्या कामगारांची भेट घेतली. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यासाठी बोगद्याबाहेरच जवळपास ४० रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. सर्व कामागारंची प्रकृती उत्तम असल्याचीही माहिती देण्यात येत आहे.
स्वतः (Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बचाव मोहिमेवर लक्ष ठेवून होते.
कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्यावर (Union Minister Nitin Gadkari)केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या कामगिरीवर समाधान व्यक्त करताना बचाव पथकाचे अभिनंदन केले आहे व सुखरूप बाहेर आलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.