

Laapataa ladies : ‘लापता लेडीज’च्या शिरपेचात मानाचा तुरा, भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत एंट्री
भारताकडून ऑस्करसाठी ‘लापता लेडीज’ ची निवड झाली आहे.
2025 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज चित्रपटाची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक किरण राव हिने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धूमाकूळ माजवला. फक्त क्रिटीक्स नव्हे तर लोकांनाही हा चित्रपट खूप आवडला, त्याचे प्रचंड कौतुकही झाले.
आता या चित्रपटाच्या क्रू साठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. भारताकडून ऑस्करसाठी ‘लापता लेडीज’ ची निवड झाली आहे. 2025 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज चित्रपटाची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्श, कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर क्रू यांच्यासाठी हा अतिशय आनंदाचा , अभिमानाचा क्षण आहे.