

ज्येष्ठ नागरिक महामंडळाची 14 ला निदर्शने
नागपूर(Nagpur), 13 जुलै :- ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कॅबिनेट दर्जाचे मंत्रालय द्यावे यासारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ, विदर्भतर्फे रविवारी, 14 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजता गांधी पुतळा, व्हेरायटी चौक, सीताबर्डी येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.
वाहनांचे नामांकन (नॉमिनेशन), 65 वर्षांवरील महिला ज्येष्ठांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना लागू करावी, रेल्वे प्रवासी सवलत पूर्वीप्रमाणे लागू करावी, इपीएस 95 लाभार्थींना कोश्यारी कमिटी शिफारशी लागू करावी आणि 1.9.2014 पूर्वीच्या निवृत्तांना वाढीव पेंशन लागू करावी, कम्युटेशन वसुली कालावधी 10 वर्षाचा कोरोना काळातील रोखलेले 18 महिन्याचा महागाई भत्ता त्वरीत देण्यात यावा, इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.
ज्येष्ठांसह सर्व नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे, विदर्भ अध्यक्ष प्रभुजी देशपांडे(Prabhuji Deshpande), सचिव अँड. अविनाश तेलंग(And. Avinash Telang) व कमलाकर नगरकर, दीपक शेंडेकर, विनोद व्यवहारे, प्रकाश मिरकुटे, ईश्वर वानकर, हेमंत शिंगोडे, उल्हास शिंदे, भरत महाशबद्धे, रामदास ठवकर, प्रमोद अंजनकर, ब्रजराज कपाटे यांनी केले आहे.