बेरोजगारांच्या मागण्यांसाठी एमआयएमचे ठिय्या आंदोलन

0

 

 

(Buldhana)बुलढाणा – बुलढाणा जिल्हा परिषदेच्या योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्याने काम देणे आणि बेरोजगारांना कामाचे वाटप करणे. या प्रक्रियेत राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप तात्काळ थांबवावे, अशी मागणी करीत आज (District President of MIM Dr. Mobin Khan)एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणा देत मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी हातात बेशरमचे झाड घेऊन आंदोलन केले. तसेच वेळीच कारवाई न केल्यास बांधकाम विभागाच्या मुख्य प्रवेश द्वाराला टाळे ठोकण्याचा इशारा डॉ. मोबीन खान यांनी दिला आहे.