The American Dream :अमेरिकेच्या स्वप्नात लाखोंनी कर्जबाजारी…नेमकं प्रकरण काय?

0

The American Dream नागपूर (Nagpur) : कॅनडामध्ये वाहनचालकाची नोकरी करण्यासाठी अवैधमार्गाने गेलेल्या नागपुरातील एका युवकाचे मॅक्सिकोतून गुन्हेगारांनी अपहरण केले. या युवकाचा पैशांसाठी अतोनात छळ केला. त्याच्याकडून ५० लाख रुपये उकळले. सलग तीन दिवस पायी चालवल्यानंतर अमेरिका सीमेवर सोडून दिले. अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरणाचा गुन्हा दाखल करून त्याला भारतात परत पाठवले. हा युवक गुरुवारी सकाळी नागपुरात पोहचला. त्याने चौकशीदरम्यान जी प्रवासकथा सांगितली ती अंगावर काटा उभा करणारी आहे. हरप्रीत सिंग लालिया (३३, बाबा बुद्धाजीनगर, पाचपावली) असे या युवकाचे नाव आहे.

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीयांना बुधवारी डिपोर्ट करण्यात आले व त्यांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमध्ये उतरले. यावरून राजकारण तापले असताना या १०४ जणांमध्ये एक नागपुरकर देखील असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित तरुण बॅंकेतून कर्ज घेऊन व नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन निघाला होता. आयुष्यात सेटल होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला, मात्र अमेरिकेत स्वत:ला घडविण्यात यश न आल्याची सल त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसून येत होती.

हरप्रीतसिंग लालिया असे संबंधित तरुणाचे नाव असून तो गुरुवारी नागपुरात परतला. ५ डिसेंबर २०२४ रोजी तो नागपुरातून निघाला. त्याच्याजवळ पासपोर्ट होता व कॅनडाच्या व्हिसावर प्रवास करायचा होता. त्याची कनेक्टिंग फ्लाईट ६ डिसेंबर रोजी अबू धाबीहून होती. मात्र त्याला त्या विमानात चढूच देण्यात आले नाही व त्याला दिल्लीला परतावे लागले. दिल्लीत आठ दिवस राहिल्यानंतर तो इजिप्तमधील कैरोकडे विमानाने निघाला. त्यानंतर त्याला इजिप्तहून स्पेनमार्गे कॅनडातील मॉन्ट्रियालला पाठविण्यात येणार होते. प्रत्यक्षात स्पेनमध्ये उतरल्यानंतर त्याचे सामानच तिथे पाठविण्यात आले. स्पेनमध्ये ४ दिवस राहिल्यानंतर त्याला ग्वाटेमालाला पाठवण्यात आले, त्यानंतर तेथून निकाराग्वा, होंडुरास, मेक्सिको मार्गे तो टैकेटन सीमेवर पोहोचलो. या प्रवासादरम्यान त्याने ४९ लाख ५० हजार रुपये खर्च केले. त्यासाठी त्याने बॅंकेचे कर्जदेखील घेतले होते.

एजंटच्या निष्काळजीपणामुळे कॅनडाऐवजी पोहोचला अमेरिकेत

हरप्रीतसिंग अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले होते. आम्हाला सांगण्यात आले की आम्हाला सोडण्यात आले आहे आणि मात्र आमच्या हातापायात बेड्या होत्या. मी कॅनेडियन व्हिसावर गेलो होतो आणि कॅनडामध्ये काम करण्यास उत्सुक होतो. पण एजंटच्या निष्काळजीपणामुळे मला या मार्गाने जावे लागले, असे त्याने सांगितले.

मेक्सिकोतील माफियांशी झाला सामना

हरप्रीतसिंगला मेक्सिकोतील आर्मिसेल्लो येथे माफियांनी पकडले होते. काही दिवस त्याला तेथे घालवावे लागले. मेक्सिकोतील ताकैत पर्वतरागांमध्ये चार तास चढावे लागले व त्यानंतर १६ तास अमेरिकेच्या बाजुला चालावे लागले. ते क्षण केवळ भितीने भरलेले होते. केवळ आयुष्यातील स्वप्ने पूर्ण होतील या अपेक्षेत मी सर्व काही सहन केले. मात्र आता सर्व काही संपले आहे अशी भावना त्याने व्यक्त केली.

‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले’, अशी म्हण आपण अनेकदा ऐकतो. तर या म्हणीचा प्रत्यय नागपूरमधील एका तरुणाला आला आहे. अमेरिकेन काल अवैध भारतीय प्रवाशाना भारतात परत पाठवले. अमेरिकन विमान त्यांना घेऊन भारतात आले. त्यात नागपूरमधील एक तरुणाचे अमेरिकेचे स्वप्न भंगलेच नाही तर त्याला मोठा आर्थिक फटका बसला. या तरुणाचे जवळपास 50 लाख रुपये गेले. त्याला प्रवासादरम्यान जो त्रास सहन करावा लागला, तो वेगळाच. देशात परतल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची चौकशी केली.