डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दूध वाटप कार्यक्रम

0

 

चंद्रपूर (Chandrapur ) : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर शहरातील आंबेडकर पुतळा चौक येथे दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष रितेश तिवारी, प्रदेश प्रतिनिधी महेश मेंढे, राजू वासेकर, प्रसन्ना शिरवार, नौशाद शेख, भालचंद्र दानव, महिला अध्यक्ष्चंदाताई वैरागडे, पंचायत समिती माजी सभापती हर्षाताई चांदेकर, सुनीताताई अग्रवाल , वंदना भागवत, रेखा वैरागडे, सुनंदाताई धोबे, कोसारा ग्रामपंचायत उपसरपंच रोशन रामटेके, वैभव अमृतकर, बापू अन्सारी, सचिन रणदिवे, याची उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर महेश मेंढे यांनी उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी आणि कार्याचे स्मरण केले. त्यांनी सांगितले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते ज्यांनी भारताच्या संविधानाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यांनी गरजू मुलांना आणि महिलांना दूध वाटप केले.