

नागपूर (Nagpur) :– मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायजेशनच्यावतीने शनिवारी चिटणवीस सेंटर येथे ‘श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील संगीत- एक विचार’ या कार्यक्रमद्वारे श्याम बेनेगल यांच्या कार्यकर्तृत्वाला मानवंदना देण्यात आली. या दृकश्राव्य स्वरुपाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण अजेय गंपावार यांनी केले.
‘नागपूर एडिशन: पुणे इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल’ च्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारत एक खोज’ या श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या दूरदर्शन मालिकेच्या ‘सृष्टी का कौन हैं कर्ता, कर्ता हैं व अकर्ता?’ या शीर्षकगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या चित्रपटांच्या कथेतील सामाजिक राजकीय-आशय विषय संगीतातून प्रकट होतो. भारतीय मुल्ये जोपासत आणि प्रादेशिक विविधता जपत, साहित्यमधील उच्च अभिरुचि प्रदर्शित करणाऱ्या त्यांच्या चित्रपटातील गाणी सुद्धा त्या चित्रपटांच्या जातकुळीला सुसंगत होती, असे गजेय गंपावार म्हणाले. बेनेगल यांच्या अंकुरपासून निशांत, मंथन, भूमिका, जुनून, मंडी, त्रिकाल, सूरज का सातवा घोडा या चित्रपटांच्या संगीताचे वेगळेपण अजेय गंपावार यांनी उलगडून दाखवले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.