

टाळ्या-शिट्ट्यांनी सभागृह दणाणले
नागपूर(Nagpur):-2 जून सिद्धीविनायक पब्लिसिटी आणि अभिरुची फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डा
यमंड्स फॉरएव्हर अनफर्गेटेबल मेलोडिज ऑफ सुपरस्टार्स ऑफ बॉलिवूड’ या कार्यक्रमात संपूर्ण सभागृह शिट्ट्या आणि टाळ्यांनी अक्षरशः दणाणून गेले.
रेशीमबाग येथील भट सभागृहात रविवारी संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाची निर्मिती, दिग्दर्शन आणि संकल्पना समीर पंडित यांची होती. कार्यक्रमाची सुरुवात पार्वती नायर यांच्या ‘क्या जानू सजन’ या गाण्याने झाली. यानंतर गोल्डी यांनी अंधेरी रातो में’, अतिथी गायिका गुल सक्सेना यांनी ‘प्यार करने वाले’, ‘रिमझिम गिरे सावन’, यानंतर अतिथी गायक आलोक काटदरे यांनी ‘मै हू डॉन’ हे गाणे प्रेक्षकांमधून सादर करून सभागृह दणाणून टाकले. काही गाण्यांवर त्यांनी प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले.
त्यांनी ‘रूप तेरा मस्ताना’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘मेरे दिल में आज क्या है’ ही गाणी त्याच जोशात सादर केली. याशिवाय, मै शायर बदनाम, कुछ तो लोग, चिंगारी, मंजिले अपनी जगह, प्यार में दिल पे, अगर तुम ना होते, रोते हुये आते, जवानी जानेमन, ये जो मोहब्बत, नदिया से दरिया, सारा जमाना, जब अंधेरा होता, जय जय शिवशंकर, जानू मेरी जान, रूप तेरा मस्ताना, ओ मेरे दिल, मेरे दिल में आज, मेरे सपनों की रानी, दो लफजों की है, हम दोनो दो प्रेमी, देखा एक ख्वाब, परदेसिया, तू मुझे कबुल आदी गाणी सादर केली. अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी वन्समोअर दिले.
या गायक कलाकारांना परिमल जोशी, ऋग्वेद पांडे, प्रवीण लिहितकर, राजू गजभिये, महेंद्र वातुळकर, अशोल तोकलवार, पंकज यादव, अरविंद उपाध्ये आदी वाद्यवृंदांनी छान साथ दिली. कार्यक्रमाच्या मध्यंतरात सर्व गायक कलाकार आणि वाद्यवृंदांचा सत्कार करण्यात आला.
सुप्रसिद्ध निवेदिका वृषाली देशपांडे यांनी आपल्या उत्कृष्ट निवेदनाद्वारे कार्यक्रमाला रंगत आणली. त्यांनी दोन्ही सुपरस्टार्सचा सिनेप्रवास छान उलगडला. साऊंड अभिषेक लिल्होरे, लाईट मिथुन मित्रा, स्टेजची जबाबदारी राजेश अमीन यांनी सांभाळली. कार्यक्रमात गायकांना प्रेक्षकांनी टाळ्यांनी उत्तम साथ दिली.