

पेटेंट इनोव्हेटर्सला इंडस्ट्रीशी जोडण्याचा प्रयत्न
असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) च्यावतीने ७, ८ आणि ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘अडव्हांटेज विदर्भ – 2025 : खासदार औद्योगिक महोत्सव’ मध्ये पहिल्यांदाच मेगा पेटेंट गॅलरी बघायला मिळणार आहे.
एआयडी व एनलाईनट द सोल यांच्या संयुक्त वतीने ‘पेटेंट इंडस्ट्री कनेक्ट (पीआयसी) अॅडव्हांटेज विदर्भ २०२५’ या स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले होते. महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांने प्रोटोटाइप तयार करून सादर करायचे होते. या स्पर्धेत पर्यावरण/सामाजिक प्रभाव, कोअर इंडस्ट्री, केमिकल, हेल्थ टेक्नॉलॉजी, बायोटेक, अॅग्रोटेक, आयओटी/रोबोटिक्स/एआय आणि फिनटेक या श्रेणींमधून २०४ प्रोटोटाइप सादर करण्यात आले. त्यातून तज्ज्ञांच्या चमूने उत्कृष्ट असे 32 पेटेंट जेम्स आणि 9 पेटेंट स्टार्स निवडले असून त्यांचे प्रदर्शन अॅडव्हांटेज विदर्भ 2025 मध्ये उभारण्यात आलेल्या मेगा पेटेंट गॅलरीमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये ऑटो व्हेंट डिव्हाइस, स्प्रे फॉर पार्शियल बर्नंट डॉक्युमेंट्स, क्रॉपिस, फाइंड मी शूज इत्यादींचा समावेश होता.
हे सर्व प्रोटोटाइप अंतिम स्वरूपाचे असून व्यावसायिकीरण तसेच इन्क्युबेशनसाठी तयार आहेत, असे एज्युकेशन अँड स्क्रील डेव्हलपमेंटचे संयोजक डॉ. सी. सी. हांडा यांनी सांगितले.
नागपूर विद्यापीठाचे प्रा. डॉ. प्रशांत कडू, पीसीईचे डॉ. मनिष गिरीपुंजे आणि एनलायटन द सोलचे विनय चावला यांचे सहकार्य तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे.