

नागपूर (Nagpur), 11 फेब्रुवारी
गेल्या 13 वर्षांपासून रस्ता सुरक्षा आणि वाहतूक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या जनआक्रोशच्या देशभरातील 25 शाखांमधील समन्वयकांची दुसरी द्विवार्षिक बैठक नागपूर येथे 15 व 16 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीचे उद्घाटन उद्घाटन दै. हितवादचे मुख्य संपादक विजय फणशीकर यांच्या हस्ते शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी सीएसआयआर-नीरी सभागृह, वर्धा रोड येथे सकाळी 9.45 वाजता होईल. सीएसआयआर-नीरीचे मुख्य शास्त्रज्ञ पी. एस. कुंभारे यांची यावेळी विशेष उपस्थिती राहील.
महाराष्ट्रासह नवी दिल्ली, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हरयाणा, कनार्टक आणि गोवा राज्यांमधील विविध शाखांचे जनआक्रोश प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. अधिक माहितीकरिता जनआक्रोशच्या संकेतस्थळावर किंवा 9422105911 वर कॉल करावा, असे जनआक्रोशचे अध्यक्ष प्रकाश खांडेकर आणि सचिव रविंद्र कासखेडीकर यांनी कळवले आहे.