

उमेदवारांकडून प्रचाराला वेग ; उद्याला होणार मतदान
चंद्रपूर(Chandrapur)ता.१७:- मागील १५ दिवसापासून चंद्रपूर जिल्हा मेडिकल असोसिएशन निवडणुकीच्या प्रचाराची धूम सुरू होती. या प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस असून उद्या रविवार १८ ऑगस्ट रोजी मतदान पार पडणार आहे. यंदा या निवडणूक परिवर्तन पॅनल, एकता पॅनल, केमिस्ट संघर्ष पॅनल अश्या तीनही पॅनलने आपआपल्या उमेदवारांचा प्रचार केला असून उद्या मतदाना अंती विजयी उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे.
मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यात मेडिकल असोसिएशन निवडणुकीच्या प्रचाराची धूम सुरू होती. यंदा या निवडणुकीत बहुजन हिताय रिटेल व होलसेल समर्थित परिवर्तन पॅनल (पेन) या चिन्हावर, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन रिटेल, होलसेल समर्थित पॅनल ( छत्री) तर केमिस्ट संघर्ष पॅनल (मोबाईल) चिन्ह मिळाले आहे. सर्वच उमेदवारांनी मतदानासाठी जिल्हाभरात दौरा करून आप-आपल्या उमेदवारांचा प्रचार केला आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनामाच्या माध्यमातून विविध आश्वासने देण्यात आली आहे. आज या निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असून उद्या रविवार दि.१७ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळात जिजाऊ लॉन येथे मतदान पार पडणार आहे. विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडेल याची त्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.