दोन राजेंच्या वादात गृहमंत्री फडणवीसांची मध्यस्थी

0

(Karad)कराड : (BJP MP Udayanraje Bhosale)भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि (MLA Shivendra Singh Raje Bhosale)आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यातील वाद सर्वविदित आहे. काल सातारा बाजार समिती इमारतीच्या भूमिपूजनावरून या दोन नेत्यांमध्ये संघर्ष झाल्यावर वातावरण तंग झाले होते. या दोन नेत्यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडल्यावर सातारा शहर पोलिसांनी परस्परांच्या तक्रारीवरुन उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केलेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे की, सातारा येथील संभाजीनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत माझ्या मालकीची जमीन आहे. तरीदेखील आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता शिवेंद्रसिंह राजे व त्यांच्या समर्थकांनी आमच्या जागेत बेकायदेशीर घुसखोरी करत कायमस्वरुपी बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात सुमारे पन्नास जणांवर गुन्हे दाखल झाले असून दोन्ही नेत्यांनी गुरुवारी (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

खासदार भोसले व आमदार भोसले यांनी स्वतंत्ररित्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना कालच्या घटनेची माहिती दिल्याचे समजते. कराड येथील गेस्ट हाऊसमध्ये देवेंद्र फडणवीस सध्या मुक्कामी आहेत. येथे प्रथम आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली व बंद दाराआड त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली व चर्चा केली.

फार काही गंभीर नाही-फडणवीस
दरम्यान, दोन्ही राजेंच्या भेटीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, यावेळी विकासकामांबाबत चर्चा झाली. कालचा प्रकार फार काही गंभीर नाही. विकासकामांवरून अशा घटना घडत असतात, असे ते म्हणाले.