
नागपूर NAGPUR : समृध्दी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सरकार तर्फे विविध उपाययोजना करण्यात येत असून समृध्दी वर असलेल्या विविध 14 पॅचेस एकसारखे आणि एकाच दर्जाचे केले जाईल तसेच धक्का मुक्त रस्ता करण्याचा सुचना एमएसआरडीसी ला देण्यात येतील अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली.
या संदर्भात तारांकित प्रश्न महादेव जानकर, सत्यजित तांबे यांच्यासह अनेक सदस्यांनी सभागृहात मांडला होता.
समृध्दी महामार्गावर वन्यजीव येण्याचा घटना टाळण्यासाठी जाळ्या बसविण्याचा सुचनाही एमएसआरडीसी ला देण्यात येईल अशी माहिती ही देसाई यांनी यावेळी दिली.