

पुणे:- पुण्यात शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बदलापूर (Badlapur child abuse) येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्यावतीने आज आयोजित करण्यात आलेला बंद रद्द करण्यात आला आहे. असे असले तरी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काळी फीत लावून मुक आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शरद पवार, सुप्रिया सुळे व इतर काही नेतेमंडळी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. काल उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. मात्र, या बंदला मुंबई उच्च न्यायाण्याने बेकायदेशीर ठरवत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे आंदोनल रद्द केले होते. मात्र, शरद पवार यांनी आज मुक आंदोलनाची घोषणा केली होती.