पोस्ट ऑफिसला भीषण आग

0

कार्यालयातील साहित्य जळून खाक

(Amravti)अमरावती – अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील (Post office) पोस्ट ऑफिसला भीषण आग लागली आहे. पहाटे तीन वाजता शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. आग भिषण असल्याने कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आगीमध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे. अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. मात्र, महत्त्वाची सर्व कागदपत्रे या आगीत जळून खाक झाली आहेत. डाक घरात अचानक लागलेल्या आगीने मोठं नुकसान झाले अशी माहिती (Vasundhara Gulhane)वसुंधरा गुल्हाने, प्रवर अधीक्षक यांनी दिली.