

नागपूर(Nagpur):अखिल भारतीय त्रिपदी परिवार, नागपूर शाखेच्या वतीने आयोजित सप्तशती गुरुचरित्राचे सामूहिक पारायण महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहात पार पडले.
भरतनगर येथील दत्त मंदिरात करुणात्रिपदीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रार्थनेनंतर उपस्थित भक्तांनी सप्तशती गुरुचरित्राच्या सामूहिक पारायणाला सुरुवात केली. यानंतर उद्बोधन करण्यात आले. सहभागी भक्तांनी भजन आणि स्तोत्र म्हटले. प्रसन्न वातावरणात आरती झाली. यानंतर महाप्रसादाने सामूहिक पारायणाची सांगता झाली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात श्राव्य माध्यमातून भक्तांना बाबा महाराजांच्या आशीर्वचनाचा लाभ मिळाला. कार्यक्रमात परिसरातील भक्तांचा मोठ्या प्रमाणात उत्साही सहभाग होता, असे संयोजिका साधना हिंगवे म्हणाल्या.