(Mumbai)मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने उद्या मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा (Morcha on BMC) दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. विशेष म्हणजे राज्य सरकारने अलिकडेच मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांची चौकशी सुरु केली आाहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मुंबई महापालिकेत वर्षभरापासून नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. महापालिकेत रस्ते काँक्रिटीकरण,स्ट्रीट फर्निचर अशा अनेक बाबतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सुरु आहे. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकांकडे असला तरी प्रशासकांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून कंत्राटे देताना भ्रष्टाचार होत असल्याचा ठाकर ठाकरे गटाचा आरोप आहे.
मुंबई महानगर पालिका हे ठाकरे गटाचे शक्तीस्थान मानले जाते. आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गटासाठी महत्त्वाची असणार आहे. बंडखोरीनंतर अनेक त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. मुंबईतील अनेक नगरसेवकही आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता, ठाकरे गटाकडून उद्याचा मोर्चा हा शक्ति प्रदर्शनाचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.