मराठा आरक्षणावर दोन दिवसांत निर्णय घ्या-जरांगे

0

 

परभणी-मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे दोन दिवस असून दोन दिवसांत निर्णय घ्या आणि मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे २४ तासांत मागे घ्या, असा इशारा मनोज जरांगे यांनी जाहीरसभेतून राज्य सरकारला दिला आहे. (Maratha Reservation Issue)
जाहीरसभेत बोलताना जरांगे म्हणाले, ‘नेत्याला जातीपेक्षा मोठे मानू नका. जात संकटात सापडली, पोरेही संकटात सापडली आहेत. भानावर या. आपल्या लेकरांपेक्षा आपल्याला मोठे कोणीही नाही. मी तुमच्यासाठी माझा जीव पणाला लावलाय. मला तुमच्या साथीची गरज आहे. तुमचे पाठबळ मला हवे आहे. तुमच्या आर्शिवादाची मला गरज आहे. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावू लढायला हवे. मी मरणाला भीत नाही. सरकारने मला शत्रू मानायला सुरुवात केली, मी त्यांना भीत नाही, असेही ते म्हणाले. याआधी सरकारला तीन महिने वेळ दिला, समिती गठीत झाली, तेव्हा काही झाले नाही. पुन्हा सरकारचे शिष्टमंडळ आले, ३० दिवसांचा वेळ मागितला ४० दिवसांचा वेळ दिला. समितीला नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे आता तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय, असा सवालही त्यांनी केला. मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. देव जरी खाली आला तरी, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही. आता मराठ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. सरकारने एकाला अटक केली की, सर्वांनी तुरुंगात जायचे. सरकारने हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे, नाही तर जड जाईल, असा त्यांनी दिला.