यामुळे अनेक मेंढ्या दगावल्या

0

– संतोष महात्मेंच्या नेतृत्वात मेंढपाळ धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

अमरावती (Amravti), 13 सप्टेंबर

वनविभागाच्या काही भ्रष्ट व मुजोर अधिकाऱ्यांमुळे मेंढपाळ धनगरांना वारंवार नाहक त्रास देण्यात येत आहे. .चांदुर रेल्वे भागात परंपरागत अधिवास करणाऱ्या मेंढपाळांना वनविभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या उपदव्यापामुळे मरणाच्या यातना होत आहे. त्यांच्या मेंढ्यांचा चारा व पाणी बंद करण्यात आल्याने उपासमारीमुळे काही मेंढ्या दगावल्या.त्यामुळे संतप्त झालेल्या मेंढपाळानी संतोष महात्मे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत वनविभागाच्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली अन्यथा मेंढपाळ धनगर विकास मंचच्या वतीने राहुटी आंदोलन उभारल्या जाईल, व या करिता वनविभाग सर्वस्वी जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला.

मागील पाच सहा पिढ्यापासून पावसाळ्यातील चार महिन्याकरिता चांदुर रेल्वे या भागात वास्तव्यात असलेल्या मेंढपाळांना जाणीवपूर्वक त्रास दिल्या जात आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे जर असंतोष वाढत असेल, तर त्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपणास विनंती की मेंढपाळांना चांदुर रेल्वे भागातील सावंगा विठोबा येथे वनविभागाच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या धोरणामुळे मुळे मेढ्या मृत झालेल्या प्रकरणात व त्या परीसरातील शेतकरी, गावकरी त्यांना १०० वर्षापासून एकोप्याने राहणाऱ्या मेंढपाळांच्या विरोधात वन विभाग जाणीवपूर्वक तक्रारी करायला सांगून मेंढपाळांच्या विरोधात त्यांचे माथळे खराब केल्यानंतर ते गावकरी मेंढपाळांना मारहाण करण्याचा प्रयत्न करतात.

ज्या प्रकारामध्ये एखाद्याची जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या होत असलेल्या त्रासाबाबत तत्काळ चौकशी करण्यात येऊन यासंदर्भात दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अन्यथा मेंढपाळ धनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढेल. असे ही निवेदनात स्पस्ट केले आहे.प्रायोगिक तत्त्वावर अर्धबंदिस्त मेंढी पालन प्रकल्प, या मेंढपाळांकरिता चराऊ जमीन देण्याबाबत राज्य सरकार कडून निर्देश दिलेले होते. या मेंढपाळ धनगरांना स्थैर्य देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन पुढाकार घेत आहे.

याबाबतीत मंत्रालयीन स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये काही उपाययोजना सुचविण्यात आलेल्या होत्या ज्यामध्ये अर्धबंदिस्त मेंढी पालन प्रकल्प, काही वनक्षेत्र जमिनीवर कालबद्ध पद्धतीने चारा लागवड करून मेंढपाळांना चारा उपलब्ध करून देण्याविषयी ठरलेले होते.

परंतु याबाबत वनविभगाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही. वेळ काढूपणाचे धोरण अवलंबित असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व मेंढपाळांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे.