
मुंबई- मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांचा थरकाप उडविणाऱ्या आहेत. 26/11 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी पोलीस अधिकारी मंगेश नाईक यांनी त्या रात्री गिरगाव चौपाटी येथील घटनाक्रम आज कथन केला. 26/11 terror attack
नाईक म्हणाले, आम्हाला सीएसटी परिसरात अनेक ठिकाणी फायरिंग चालू आहे हा मॅसेज मिळाला. जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी आम्ही टुरिजम गाडीमध्ये बसून लोकांना सतर्क केले. गिरगाव चौपाटी येथील फोर्टविल जंक्शन येथे आम्ही नाकाबंदी केली. दरम्यान,एक स्कोडा गाडी त्यामार्गे येतेय अशी माहिती मिळाली, ज्यामध्ये हत्यारे आणि शस्त्रे आहेत.आम्ही ती गाडी अडवली तेव्हा त्यांनी हेडलाईट आणखी प्रखर केल्या, त्यामुळे त्यातील लोक दिसत नव्हते. त्यांनी पोलिसांच्या गाडीवर आपली गाडी चढवण्याचा प्रयत्न केला .त्या गाडीत अतिरेकी होते हे लक्षात आले. पोलिसांनीही प्रसंगी फायरिंग स्टार्ट केली, आणि एक जण त्यात जखमी झाला.पोलिस आणि दहशतवादी यांच्यात झटापट झाली या झटापटीत माझ्या हाताच्या बाजूने ६ गोळ्या लागून गेल्या .त्यावेळी आम्ही त्या आतंकवाद्यांना मारलं. त्यातील एकाला आम्ही वाचवलं .आम्ही त्याची झडती घेऊन चौकशी केली.आम्ही जर त्यादिवशी त्य़ांना रोखलं नसतं तर अनेकांचा जीव गेला असता हे सांगताना तो प्रसंग त्यांच्यापुढे तरळला.