ओबीसी प्रश्नी बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय -डॉ तायवाडे

0

नागपूर- राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे पाठपुरावा केलेले अनेक विषय आजच्या बैठकीत मार्गी लागले. आश्वसनाची पुर्ती झाली. आज दोन जीआर मान्य करून दिले. बैठक सुरू होण्यापूर्वी जीआर निघाला आहे. हॉस्टेल नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल मंजूर झाले. ज्ञानज्योती आधार योजनेसोबतच,PGDCA, BCA BBAला स्कॉलरशिप मिळणार आहे.
324 कोटीच्या योजना महाज्योतीच्या माध्यमातून मिळणार आहेत असे प्रतिपादन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी केले.
100 विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी स्कॉलरशिप मान्य केली.
नागपुरात असणारे दोन हॉस्टेल तयार आहेत ते ओबीसींसाठी देण्यासंदर्भात सुचवले आहे. आमदार डॉ. परिणय फ़ुके यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले.
29 सप्टेंबरला ओबीसींची बैठक झाली होती.ओबीसी विभाग बैठकीत 80 टक्के मागण्या पूर्ण झाल्या आहेत.
उर्वरित मागण्यांवर जीआर आणि अर्थ विभागाशी चर्चा सुरू आहे. 36 जिल्ह्यात 36 हॉस्टेल होणार आहे. भाड्याने ते घेण्यात आले आहे.
यात ज्ञानज्योती आधार योजनेतून मेट्रो सिटीत 60 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.