

अमरावती (Amravati) : हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गारपीट व वादळी वाऱ्याच्या पावसाने मोठे थैमान घातले आहे.काल मध्यरात्री जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील रामा साऊर या गावात अनेक घरांचे छप्पर उडाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रात्रीपासून गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे पावसात भिजले आहे. यासह वर्षभरासाठी घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य सुद्धा पावसात भिजल्याने खराब झाले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे व आम्हाला मदत करावी अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.