मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला निघणार मुंबईकडे

0

 

जालना-मराठा आरक्षण संदर्भात आता अंतिम लढा सुरू असून
अंतरवाली सराटीतून निघेपर्यंत चर्चा करणार निघाल्यानंतर चर्चा बंद. 20 जानेवारीला जरांगे पाटील पायी चालत मुंबईकडे कुच करणार आहेत.
26 तारखेपर्यंत जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह मुंबईत पोहोचतील.
मुंबईकरांना त्रास झाला तरी आम्ही त्यांचेच भाऊ आहेत.क्युरेटिव्ह पिटीशन आम्ही नाकारली नाही पण ते आरक्षण टिकणारे पाहिजे.
छगन भुजबळांना आता महत्व देणार नाही ते आता बधीर झाले आहेत असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात

जालना- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आठ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन अंतरवाली सराटी येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाच्या भेटीगाठी घेऊन परभणी व बीड येथे जाहीर सभा घेतल्यानंतर त्यांची प्रकृती थोडी खराब झाल्यामुळे ते आज पुन्हा छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.