मनोज जरांगे पाटील म्हणतात,आता ही शेवटची संधी!

0

 

छ.संभाजीनगर SAMBHAJI NAGAR  अंतरवाली येथे पंधरा दिवस उपोषण केल्यानंतर MNOJ JRANGE मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केले. आज छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय क्रीडा संकुल कार्यालयामध्ये संवाद मेळावा झाला. यावेळी त्यांनी मराठा समाजातील नागरिकांना मार्गदर्शन केले.मी इतके निर्दयी सरकार आजपर्यंत पाहिले नाही. ज्यात मराठा समाजाचे हित नाही तो कायदा आम्हाला मान्य नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. तसेच जिवंत आहे तोपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही, समाजावरील अन्याय आता सहन होत नाही. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढत राहील, येणाऱ्या 14 तारखेला सरकारला 30 दिवसाचा वेळ मागून घेतला होता तो पूर्ण होईल परंतु आपण त्यांना आणखी दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे. त्यामुळे 24 तारखेला सरकार आपली भूमिका जाहीर करणार आहे. 14 तारखेला अंतरवली येथे मोठी सभा ठेवण्यात आलेली आहे .त्या सभेला सर्व समाजातील नागरिकांनी यावे, घरी कोणी थांबायचं नाही जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती हवी आहे .एक दिवस काम बुडवल्याने मराठा समाजाचे जर भलं होत असेल तर सर्वांनी एक दिवसाचं काम बुडवून अंतरवलीला यावं असे जरांगे यांनी सर्वांना आवाहन केले. दरम्यान,आंदोलन करा, पण उग्र आंदोलन नको जाळपोळ नको ,मराठा समाजातील मुलांना शिकून पुढे जायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला नको मराठा समाजातील मुलांनी आत्महत्या करायची नाही, ती मी होऊ देणार नाही अशी ग्वाही जरांगे पाटील यांनी दिली.जरांगे पुढे म्हणाले, जातिवंत मराठे आहेत एकजूट पाहून मी भारावून गेलो आहे. आता हे शेवटचं आंदोलन आहे. सरकारने एक महिन्याची वेळ मागितली हीच मराठ्यांना मोठी संधी आहे. सरकारने दिलेल्या वेळेत आरक्षणाचा निर्णय घ्यावा असा इशारा त्यांनी दिला. समिती हैद्राबाद, मुंबई, संभाजीनगर असा नुसता प्रवास करीत आहे. त्यांना 5 हजार पानांचा पुरावा मिळाला आहे यामुळे आता मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.