इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता दांडी मारणार

0

मुंबई  MUMBAI : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा वगळता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या सुमार कामगिरीनंतर उद्या बुधवारी ‘इंडिया आघाडी’ची (I.N.D.I.A. Alliance meeting) उद्या बैठक होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून या बैठकीला तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी या दांडी मारणार आहे. आपल्याला या बैठकीची कुठलीही कल्पना असून आपले कार्यक्रम यापूर्वीच निश्चित झाले आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट सांगितल्याने इंडिया आघाडी आताच फुटीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
आघाडीचा धर्म म्हणून उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अखिलेश यादव नाराज तर नितिशकुमार आजारी आहे. या बैठकीत इंडिया आघाडीतील मतभेदावर चर्चा होईल, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. इंडिया आघाडीत कुठले मतभेद असतील व काँग्रेसने काय करायला हवे, याच्यावर चर्चा होईल. उद्धव ठाकरे संध्याकाळी दिल्लीत येतील आणि त्यानंतर थेट बैठकीला रवाना होती. या निकालांचा महाराष्ट्रावर काहीच परिणाम होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. निकाल काहाही लागले तरी ही बैठक आधीच ठरली होती.