

प्रियंका फुसे यांनी पटकावला प्रथम क्रमांक
नागपुर (Nagpur):- पीएन क्रिएशन्सच्या संचालिका प्रियांका गट्टानी व नेहा गोडबोले यांनी नुकतेच मेकअप स्पर्धेचे आयोजन केले होते. हॉटेल अशोक लक्ष्मीनगर येथे कायझेन क्लब ऑफ नागपूरतर्फे प्रस्तुत या स्पर्धेत प्रियंका फुसे यांनी प्रथम तर तृप्ती तांदुळकर यांनी द्वितीय क्रमांक तर विरंगने तिसरा क्रमांक पटकावला.
‘राष्ट्रीय पोशाख’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या स्पर्धेचे परीक्षक म्हणून विभावरी गजभिये, कोमल बोकडे, धनश्री गोसावी, डॉ. प्रियांका मसेहरकर, प्रीती वर्मा, रेवती शेंडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कायझेन क्लबचे संचालक अमित डुपे, यहोवा यिरी फाऊंडेशनचे संचालक डॉ. रमेश बोरकुटे, डॉ. रश्मी तिरपुडे, ललित हारोडे, सुनील अग्रवाल, रूपा पंडित, बॉलिवूड अँकर लक तरार यांची उपस्थिती होती.
रितेश नायर, मधुर भांडारकर, सोनिया खत्री, डॉ. सीमा छाजेड, देवेंद्र तळेकर, अनुपा बडवाईक, वैशाली उके, कनक पोहीकर, मनीषा तामसकर, सोनल भगत, तृप्ती अपरेजा, सेजल तलोर, तृप्ती वारजुरकर, अनिता गावंडे, अर्चना तडसे, वृशाली जाधव, नंदिनी नौकरकर, आकांक्षा गुप्ता, पूनम गोकुळपोरे, सारिका खडसे, पुष्पा पाटील, अश्विनी मोहाडकर, कनक पोहीकर, सेजल टेलर यांचीदेखील उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला मलबार गोल्ड, ओरिजिन हर्ब्स, अश्विनी केअर ब्युटी प्रॉडक्ट पर्सनल, त्वचा क्लिनिक यांचे सहकार्य लाभले