हिंगणा माहेश्वरी मंडळा तर्फे उत्साहात साजरी केली गेली महेश नवमी

0

 

महेश नवमीच्या पर्वावर हिंगणा येथील नेहरू विद्यालय येथे महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात सकाळी रक्तदान शिबिर यावेळी 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासोबतच इंडोर गेम्स कैरम, चेस आदीचे आयोजन केले होते. तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्या गेले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून (Dr. Ratna Chaudhary )डॉ रत्ना चौधरी (मोटीवेशनल स्पीकर) Former Minister Shri Rameshji Bang)माजी मंत्री श्री रमेशजी बंग, (President of Vidarbha Regional Maheshwari Mahila Sangathan Sushmaji Bang)विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनेच्या अध्यक्षा सुषमाजी बंग, (Yashwantrao Chavan Pratishthan Nagpur Center President Maheshji Bang)यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्राचे अध्यक्ष महेशजी बंग, (Nagpur District Maheshwari Women’s Association Vice President Kiran Bang, Ex)नागपुर जील्हा माहेश्वरी महिला संगठनेच्या उपाध्यक्षा किरण बंग, माजी अध्यक्ष (Shri Harishji Bang)श्री हरिशजी बंग व (Society President Naresh Bang)समाज अध्यक्ष नरेश बंग प्रामुख्याने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भगवान महेशांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली नृत्य द्वारा दीप्ति, श्रद्धा, कृष्णा मनियार यांनी महेश वंदना प्रस्तुत केली. मान्यवरांकरिता पारुल सारडा व साक्षी बंग यांनी स्वागत नृत्य सादर केले. मंचावर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या संबोधनात सामाजिक ऐक्याचे विचार मांडले.

कार्यक्रमात राजस्थानी लोकनेते घूमर वर डॉ पूनम व रेणु राठी ने सुंदर नृत्य प्रस्तुत केले. यानंतर प्रमुख अतिथी डॉ रत्ना चौधरी यांनी जुनी व नवीन पिढी यावर आपसी सामंजस्य या विषयावर अमूल्य मार्गदर्शन केले. ममता बंग व सचिव पायल बंग यांनी उत्तम मंच संचालन केले.
विविधता में एकता यावर (Ranjana Bang)रंजना बंग, (Aruna Bang)अरुणा बंग, किरण बंग, (Unnati Maniyar)उन्नति मनियार, (Maya Maniyar)माया मनियार, रेखा बंग, स्नेहा बंग यांनी सुंदर प्रस्तुती दिली ज्यात भारत देशा च्या विविध प्रांतांच्या विशेषता दर्शविण्यात आल्या.
मंडळाद्वारे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. इंडोर गेम्स प्रधान मध्ये विजेत्यांना सुद्धा पारितोषिक देण्यात आले. सचिव आकाश सारडा यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे समारोप केले. समाजातील मान्यवरांनी कार्यक्रमाची प्रशंशा करून स्नेहभोजन केले ।

हिंगणा येथे महेश नवमी पर्वावर शोभायात्रा

२८ मई रविवार सकाळी ८.३० वाजता माजी मंत्री रमेशजी बंग व विदर्भ प्रचार व प्रसार मंत्री सूर्यप्रकाश मालपानी यांच्या विशेष उपस्थितीत वृक्षारोपण करून , नेहरू विद्यालय ते राम मंदिर पर्यंत भाव, भक्ति व पूर्ण उल्हासासह जय महेश च्या घोषणा देत शिव पार्वती ची सुंदर झांकीसह महेश नवमी पर्वावर शोभयात्रा काढण्यात आली. भगवान महेश यांचे पूजन, वंदन केले. प्रमूख अतिथि सूर्यप्रकाशजी मालपानी यांचा महेशजी बंग यांनी मंडळातर्फे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले , तत्पश्चात सर्वांकरिता प्रसाद व अल्पोहार ची व्यवस्था करण्यात आली.
अध्यक्ष नरेश बंग, (Secretary Akash Sarda)सचिव आकाश सारडा,(Women President Anita Sarda)महिला अध्यक्षा अनिता सारडा, सचिव पायल बंग यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक श्रम घेतले.