

नागपूर (nagpur):- “महिलांचा विकास हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा गाभा आहे. महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षिततेसाठी, आणि स्वावलंबनासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मात्र महाविकास आघाडीने आपल्या कार्यकाळात महिलांच्या विकासाच्या दिशेने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आजच्या या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही महायुती सरकारच्या महिला कल्याण योजनां, महिलांसाठी उचललेल्या ठोस पावलांमुळे आज महाराष्ट्रातील तमाम महिला महायुतीसोबत आहोत.”
महिला सक्षमीकरणासाठी महायुतीचे योगदान
1. सुरक्षितता आणि न्याय
महिला सुरक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्स: महिलांविरोधी गुन्ह्यांवर जलद न्याय देण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना.
स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत सुरक्षितता उपाय: सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिला पोलीस गस्त.
महिला हेल्पलाइन नंबर (181): 24×7 आपत्कालीन मदत सुविधा.
महाराष्ट्रातील महिलांसाठी महायुतीने केलेली कामगिरी दमदार
2. शिक्षण आणि सक्षमीकरण
कन्या शिखर योजना: मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत.
मुलींना मोफत सायकल योजना: ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी सायकलींचे वितरण.
व्यावसायिक शिक्षणासाठी विशेष प्रशिक्षण: महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे.
3. आरोग्य आणि पोषण योजना
मातृत्व लाभ योजना: गरोदर महिलांना आर्थिक मदत आणि मोफत आरोग्य तपासणी.
महिला आरोग्य केंद्रे: ग्रामीण भागात महिलांसाठी मोफत औषधोपचार आणि सल्लामसलत.
स्वच्छता अभियान: ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण योजना.
4. स्वरोजगार आणि आर्थिक स्वावलंबन
महिला बचत गटांसाठी कर्ज सुलभता: स्वयंरोजगारासाठी बचत गटांना बिनव्याजी कर्जे.
महिला स्टार्टअप्सला प्रोत्साहन: उद्योजक महिलांसाठी विशेष अनुदान योजना.
5. कृषी आणि ग्रामीण विकासातील योगदान
शेतकरी महिलांसाठी सबसिडी योजना: महिलांना शेतीसाठी अनुदाने आणि प्रशिक्षण.
सेंद्रिय शेतीसाठी मदत: ग्रामीण महिलांसाठी सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन आणि कर्ज उपलब्धता.
अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये देण्याचा काम शासनाने केलेला आहे. आनंदाचा शिधा आमच्या महिलांना मिळाला. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी ज्यांना बँकेच्या मार्फत पैसे मिळाले त्यांना तीन सिलेंडर फ्री देण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या महिलांविरोधी धोरणांचा पर्दाफाश
1. महिला सक्षमीकरणाबाबत अपयश:
महाविकास आघाडीच्या काळात महिला सुरक्षेचे प्रमाण घटले.
ग्रामीण भागातील महिला बचत गटांना अपेक्षित सहाय्य मिळाले नाही.
2. महिला आरोग्य सेवा अपुरी:
प्रसूतीसाठीच्या योजनांमध्ये खंड आणि निधीची कमतरता.
3. शैक्षणिक धोरणांमध्ये उदासीनता:
मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या योजना कागदावरच राहिल्या.
17 ते 19 संपूर्ण विदर्भात महिलांची रैली आणि पदयात्रा
“महायुती सरकारने नेहमीच महिलांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. महिलांचे सक्षमीकरण हे केवळ घोषणांपुरते न ठेवता, प्रत्यक्ष अमलात आणले आहे. म्हणूनच, महाराष्ट्रातील महिला आज महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. महिलांच्या पाठिंब्यामुळेच महाराष्ट्राला एक समृद्ध आणि प्रगत राज्य बनवण्याच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत.” आणि म्हणूनच संपूर्ण विदर्भामध्ये ६१ विधानसभांमध्ये 16 17 18 नवंबर या तीन दिवसांमध्ये महिलांच्या पदयात्रा आणि रॅली काढून या महायुतीच्या सरकारला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आमचे लाडके देवा भाऊ यांना समर्थन देणार आहेत.