


नागपूर दि. 15 ऑक्टोबर 2025: महान शास्त्रज्ञ, द्रष्टे लेखक आणि कोट्यवधी तरुणांचे प्रेरणास्रोत असलेले माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज महावितरणने त्यांना विनम्र अभिवादन केले. भारताच्या तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासासाठी 20 वर्षांचा कृती आराखडा तयार करणाऱ्या आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महावितरणच्या नागपूर परिमंडलातील काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ या प्रशासकीय मुख्यालयात हा आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, कार्यकारी अभियंता विजय तिवारी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) सुशील विखार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. कलाम यांच्या कार्याला सलाम केला. डॉ. कलाम यांच्या जीवनमूल्यांचे स्मरण करून त्यांच्या ‘स्वप्न बघा आणि ती पूर्ण करा’ या संदेशाची आठवण या निमित्ताने करण्यात आली.

फोटो ओळ: माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन करतांना महावितरणचे अधिकारी व कर्मचारी
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर