
बुलढाणा – बुलढाणा शहरात गल्लोगल्लीत मटक्याची दुकाने व अवैध धंदे आहेत. या अवैध धंद्यांविरोधात महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे. येत्या आठ दिवसात हे अवैध बंद केले नाही तर आठ दिवसानंतर अवैध धंद्यांविरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची भेट घेवून निवेदनाद्वारे महाविकास आघाडीचे आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश सचिव जयश्री शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्यासह असंख्य महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.