IMD Forecast : कोणत्या जिल्ह्यात पावसाचे अलर्ट? नक्की हवामान विभागाचा अंदाज काय?

0

Maharashtra Weather Update: येत्या चार दिवसात अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचे ही अलर्ट आहेत. कोणत्या भागात काय इशारा? नक्की हवामान विभागाचा अंदाज काय? पाहूया सविस्तर.

Maharashtra Weather Update: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हवामानात टोकाचे बदल होत आहेत. एकीकडे तापमानाचा वाढता पारा तर दुसरीकडे अवकाळी पावसाचे अलर्ट देण्यात आल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.( IMD Forecast) राज्यात प्रचंड उकाडा वाढला आहे. आज हवामान विभागाने विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . येत्या चार दिवसात अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचे ही अलर्ट आहेत. नक्की हवामान विभागाचा अंदाज काय? पाहूया सविस्तर.

 

बापरे ‘हे’ शहर ठरले जगातील सर्वात उष्ण| Shankhnnad News |

 

कोणत्या जिल्ह्यात पावसाचे अलर्ट?

27 एप्रिल- अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

यलो अलर्ट: वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड ,लातूर, धाराशिव, सोलापूर ,सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट आहे.

सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात अलर्ट नसला तरी पावसाचा इशारा आहे.

हवामान विभागाचे पुणे विभागाचे तज्ञ, के. एस होसाळीकर यांनी ट्विट करत येत्या आठवड्यातील हवामानाची माहिती दिली आहे.

येत्या चार दिवसात हवामान कसे?

राज्यात कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे. किमान तापमान येत्या चार ते पाच दिवसात फारसे बदलणार नाही. विदर्भात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली, परभणी, नांदेड, बीड ,जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज तापमान किती?

आज रविवार (27 एप्रिल) रोजी नोंदवलेल्या तापमानानुसार, मुंबई शहर – 33.8°, मुंबई उपनगर – 34.2°, पालघर – 35.6°, ठाणे – 34.0°, रायगड – 34.2°, रत्नागिरी – 32.0°, सिंधुदुर्ग – 32.0°, नाशिक – 38.1°, जळगाव – 43.3°, अहमदनगर – 38.2°, पुणे – 39.4°, सातारा – 40.3°, सांगली – 37.7°, कोल्हापूर – 36.8°, सोलापूर – 41.0°, औरंगाबाद – 44.4°, लातूर – 40.0°, उस्मानाबाद – 41.4°, नांदेड – 41.2°, परभणी – 44.2°, हिंगोली – 44.4°, बुलढाणा – 37.6°, वाशीम – 41.4°, अकोला – 43.9°, अमरावती – 42.8°, यवतमाळ – 42.4°, वर्धा – 42.6°, नागपूर – 42.6°, चंद्रपूर – 42.0°, गडचिरोली – 42.2°, गोंदिया – 40.9°