

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dates LIVE : मोठी बातमी! राज्यात निवडणुकीचं बिगूल वाजलं, 20 नोव्हेंबरला तारखेला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी राज्यात मतमोजणी होईल. म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
Election Commission Press Conference LIVE : 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या घरुनच मतदान करता येणार- मुख्य निवडणूक आयुक्त
85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना त्यांच्या घरीच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. व्होटर हेल्पलाईन अॅपमध्ये त्यांचे मतदान नेमके कुठे आहे, ते निवडणूक आयोग पाहू शकतात. यातील 234 जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा काळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहेत. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी उमेदवार आहेत. महाराष्ट्रात एक लाख 186 पोलिंग बुथ असतील. तसेच 288 जागांवर मतदान होणार आहे.
Maharashtra Assembly Election Date 2024 : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
Maharashtra Assembly Election Date 2024 : सर्व पोलिंग स्टेशनवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. आम्ही रिव्ह्यू केला आहे. बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना डीओबी जाहीर करण्यात आलं आहे. ते सर्व रिसोर्स वापरतील.लाइनच्यामध्ये खुर्ची आणि बेंच ठेवणार आहे. रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. थकवा दूर होईल.
ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी ८५ वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे. फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम तिकडे जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतलं जाईल. सर्व गोष्टींची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत व्हिडीओग्राफी केली जाते.
Maharashtra Assembly Election Date 2024 : महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार
Maharashtra Assembly Election Date 2024 : महाराष्ट्रात एकूण मतदार ९.६३ कोटी मतदार आहेत.
यात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी इतकी आहे. तर ४.६६ कोटी या महिला मतदार आहेत. यात २०.९९ लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार आहे.
Maharashtra Assembly Election Date 2024 : २६ नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार बनेल- निवडणूक आयोग
Maharashtra Assembly Election Date 2024 : येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार बनेल – केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission)