Maharashtra HSC 12th Result 2024 बारावीचा निकाल या दिवशी लागणार

0

12वी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 

मंगळवारी दुपारी 1 वाजता होणार निकाल जाहीर, 5 जूनपर्यंत गुणपडताळणीची संधी

महाराष्ट्र राज्य बोर्ड, पुणे द्वारे आयोजित 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी, 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. ( Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education )

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेली बारावी बोर्ड परीक्षा, फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये पार पडली होती. त्याचे निकाल मंगळवार, 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केले जातील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. सीबीएसई परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर राज्य मंडळाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी बारावीच्या निकालाबाबतचे सोमवारी पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार मंगळवार २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर ५२ हजार ८७० विद्यार्थ्यांनी, तर दहावीच्या ६५ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी १८२ केंद्रांवरून परीक्षा दिली. परीक्षा कालावधीत कॉफीचा प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेला बुधवार, २१ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली होती.

परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ – mahahsscboard.inmahresult.nic.inresults.gov.in

विद्यार्थी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (mahresult.nic.in) आपले निकाल पाहू शकतात.

  • विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल तपासण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक आहे.
  • विद्यार्थी 5 जून 2024 पर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात.
  • अधिक माहितीसाठी, विद्यार्थी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.