

मुंबई : कुस्तीचे मैदान गाजवणारे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (Maharashtra Kesari Vijay Chaudhary) हे आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरु शकतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधीक्षक चौधरी आता लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छूक असल्याची माहिती आहे. निवडणूक लढण्यासाठी त्यांची पहिली पसंती भाजप असून ते जळगाव लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छूक असल्याची माहिती आहे.
तीनदा हाराष्ट्र केसरी राहिलेल्या विजय चौधरींनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. चौधरी म्हणाले की, अद्याप कोणत्याही पक्षाशी आपले बोलणे झाले नसले तरी आपली पहिली पसंती भाजपाला राहणार आहे. गरज पडल्यास त्यासाठी आपण नोकरी सुद्ध सोडणार असल्याचे ते म्हणाले. विजय चौधरी हे जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील सायगाव बगळी या गावचे आहेत. कुस्तीमध्ये त्यांनी राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील आपले नाव कोरले आहे.