

अहिल्यानगर : Maharashtra Kesari Competition :अहिल्यानगर येथे रविवारी पार पडलेल्या ६७व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली. त्याने महेंद्र गायकवाडचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. (Prithviraj Mohol)पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये लढत झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉईंट मिळाला.
नंतर दुसरा पॉईंट महेंद्र गायकवाडने मिळवला आणि बरोबरी केली. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने पुन्हा एकदा एक पॉईंट घेतला. सामन्याच्या दरम्यान काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केलं.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची लढत पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती.