

गेल्या चार वर्षांपासून अडगळीत पडलेला राज्यपाल नियुक्त 12 जागांचा मुद्दा विधासभा निवडणुकीच्या तोंडावर मार्गी लावण्याचा सरकार प्रयत्न आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 7 जणांच्या नावाची यादी मांडण्यात आली. ही यादाी राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे. (maharashtra-election-update-governor-appointed)
राजपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून सात जणांची नावे सूत्रांची माहिती आहे. भाजपला ३ आणि दादांच्या राष्ट्रवादीला दोन जागा आणि शिंदे यांच्या शिवसेनेला दोन जागा दिल्याचे सूत्रांची माहिती आहे. पंकज भुजबळ यांचं नाव यादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांचाही यादीत नाव आहे . महिला आयोगाचे अध्यक्ष पदावर पुन्हा रूपाली चाकनकार यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रातील विधानसभेसाठीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील अशी चर्चा आहे. निवडणुकांची तारीख जाहीर झाल्या झाल्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू होईल. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निकाल जाहीर होईपर्यंत ती आचारसंहिता लागू राहते. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी त्यापूर्वीच जाहीर होईल.