

9.00 येवल्यामध्ये छगन भुजबळ आघाडीवर
वडाळ्यातूल भाजपाचे कालिदास कोळंबकर आघाडीवर
बारामती अजित पवार पिछाडीवर
वांद्रे पश्चिम भाजपचे आशिष शेलार आघाडीवर
घाटकोपरमध्ये भाजपचे राम कदम यांची आघाडी
उत्तर नागपूरमधून नितीन राऊत यांची आघाडी
8.00 :बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर
पोस्टल मतमोजणीत देवेंद्र फडणवीस आघाडीवर
साकोलीत काँग्रेसचे नाना पटोले आघाडीवर
महाराष्ट्रातल्या २८८ मतदारसंघात सकाळी मतमोजणी सुरू
* सुरुवातीच्या पोस्टल बॅलेट्सच्या मतमोजणीत महायुती पुढे
* देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, आशीष शेलार, सुनील प्रभू, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आघाडीवर
कामठीत चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर गिरीश महाजन, देवयानी फरांदे, प्रकाश भारसाकळे आघाडीवर
Update:
विधानसभा निवडणूक काही ठळक मुद्दे
▪️भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे विजयी: एकूण २६ फेऱ्यांअंती ५७,९६२ मतांनी आघाडीवर, केवळ अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
▪️ठाणे : राज्यातील महायुतीच्या प्रचंड विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानाबाहेर विजयाची खूण करत कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
▪️ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे संजय केळकर २९ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत
▪️मुंबईसह ठाणे कोकणात महायुतीला ५५ जागांवर आघाडी
▪️कणकवलीत नितेश राणे विजयी ३२ हजार ४३४ मतांनी आघाडीवर
▪️कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर = 16800 लीड सचिन बासरे पिछाडी वर
▪️कल्याण ग्रामीण राजेश मोरे = 20879 लीड मनसेचे राजू पाटील पिछाडीवर
▪️डोंबिवली – रवींद्र चव्हाण = 15647 लीड दीपेश म्हात्रे (उबाठा) – पिछाडी
▪️कल्याण पूर्व भाजपा सुलभा गायकवाड 14315 लीड महेश गायकवाड पिछाडी
▪️सावंतवाडी येथे २० हजार ३४७ मतांनी शिवसेना महायुतीचे दिपक केसरकर यांची आघाडी तर राजन तेली यांना २३३०६ व विशाल परब यांना १८२२६ मतं
▪️कल्याण ग्रामीण शिवसेना राजेश मोरे २० हजार ८७९ मतांनी आघाडीवर
▪️भिवंडी पूर्व सपा रईस शेख ३१ हजार मतांनी आघाडीवर
▪️श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अदिती तटकरे विजयी