
नागपूर:महाराष्ट्र राज्य सरकारचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूर येथील राजभवनात थाटात पडला. सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा मंत्र्यांचा हा शपथविधी प्रतिक्षित होता.
राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यावेळी मंचावर उपस्थित होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह एकूण ३९ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादा भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, शंभुराज देसाई, ॲड. आशीष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रराजे भासले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव, नीतेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर यांनी कॅबीनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
माधुरी मिसाळ, आशीष जयस्वाल, पंकज भोयर, बोर्डीकर मेघना, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जुनी, वरिष्ठ नावे टाळून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्षणचित्रे
* सर्व मंत्र्यांनी ईश्वर साक्षीने शपथ घेतली
* मंगलप्रभात लोढा यांनी संस्कृतमधून तर इतर मंत्र्यांनी मराठीतून शपथ घेतली
* गणेश नाईक यांनी राज्यपालांनी सुरुवात करून देण्यापूर्वीच शपथ घ्यायला सुरुवात केली. नंतर राज्यपालांनी “मी” म्हणून त्यांना शपथ दिली
* पंकजा व धनंजय हे चुलत बहीण भाऊ यंदा मंत्रिमंडळात असतील
* प्रत्येक मंत्र्यांची शपथ आटोपली की राज्यापालांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
* पंकजा मुंडे, आदिती तटकरे, माधुरी मिसाळ, बोर्डीकर मेघना दीपक काचोरे या महिला सदस्यांना फडणवीस मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
* एकूण ३३ कॅबिनेट, तर ६ राज्यमंत्र्यांना या समारंभात मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
* पंकज योगेश मुंडे, नीतेश राणे, आदिती तटकरे, आकाश फुंडकर, योगेश कदम, इंद्रनील नाईक ही, घरातून राजकीय वारसा लाभलेली नावे असून, या सर्वांचे वडील कधी ना कधी मंत्री राहिले आहेत.
* राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने या शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली.
विदर्भातील मंत्री
रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे, संजय राठोड, आकाश फुंडकर, आशीष जयस्वाल, पंकज भोयर, इंद्रनील नाईक या सहा वैदर्भीय लोकप्रतिनिधींना मंत्री म्हणून स्थान मिळाले आहे.
LIVE NEWS 4pm ::: लाइव्ह प्रसारण । राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. त्याआधी आज (रविवार, 15 डिसेंबर) राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. नागपूरमधील राजभवनात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानं शपथविधी सोहळा सुरु ..
शपथ घेणाऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बावनकुळे हे 2004 पासून आमदार आहेत. यंदाची त्यांची आमदार म्हणून पाचवी वेळ आहे. भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची यंदाची आमदार म्हणून निवडून येण्याची आठवी वेळ आहे. ते शिर्डीचे आमदार आहेत. भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची यंदाची आमदार म्हणून निवडून येण्याची आठवी वेळ आहे. ते शिर्डीचे आमदार आहेत. हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अल्लाह साक्ष शपथ घेतो की, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
भाजपचे कोथरुड विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते 2014 पासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. भाजपचे संकटमोचक आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून यंदाची ही सातवी वेळ आहे.
भाजपचे ऐरोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून ही सातवी वेळ आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची आमदारकीची ही पाचवी वेळ आहे.
शिंदे शिवसेनेचे मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुसे यांची आमदार म्हणून ही सलग पाचवी वेळ आहे. बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जय सेवालाल असं म्हणत संजय राठोड यांनी शपथीची सांगता केली.भाजपचे मलबार हीलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सामंत यांची यंदाची आमदार म्हणून निवडून येण्याची पाचवी वेळ आहे.
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची यंदाची आमदार म्हणून पाचवी वेळ आहे. भाजपच्या विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. भाजप संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून सलग तिसरी वेळ आहे. भाजपचे आमदार आशिष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शेलार यांची यंदाची आमदार म्हणून सलग चौथी वेळ आहे. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. शिंदे शिवसेनेचे आमदार शंभुराजे देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते इंदापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपचे माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते 2009 पासून आमदार आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपालांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपचे माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आमदारकीची हॅटट्रिक करणारे संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सावकारे हे भाजपचे भुसावळ मतरादसंघाचे आमदार आहेत.
शिंदे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून निवडून येण्याची चौथी वेळ आहे. ते संभाजीनगर पश्चिमचे आमदार आहेत. शिंदे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची आमदार म्हणून चौथी वेळ आहे.
शिंदे शिवसेनेचे महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांची अखेर मंत्रिपदाची प्रतिक्षा संपली आहे. गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून सलग चौथी वेळ आहे. भाजपचे कणकणवील मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची यंदाची आमदार म्हणून दुसरी वेळ आहे. नितेश राणे हे भाजपच्या आक्रमक नेत्यांपैकी एक आहेत. राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार मकरंद जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मकरंद जाधव हे वाईचे आमदार आहेत. ते 2009 पासून आमदार आहेत.
भाजपचे खामगाव मतदारसंघाचे आमदार पांडुरंग फुंडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फुंडकर यांची आमदरार म्हणून ही तिसरी वेळ आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून ही सलग तिसरी वेळ आहे. भाजपचे वर्धा मतदारसंघाचे आमदार पंकज भोयर यांनी घेतली राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंकज भोयर यांची आमदार म्हणून ही तिसरी वेळ आहे.
शिंदे शिवसेना रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माधुरी मिसाळ यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माधुरी मिसाळ या पर्वती मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर जिंकून आल्या आहेत. त्यांची आमदार म्हणून ही चौथी वेळ आहे.
शिंदे शिवसेनेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची ही आमदार म्हणून दुसरी वेळ आहे. राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. इंद्रनील नाईक हे पुसद मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची आमदार म्हणून दुसरी वेळ आहे.भाजपच्या जिंतूर मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांचीआमदार म्हणून निवडून येण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
















