Maharashtra Board 10th Result 2024 Declared : दहावीचा निकाल जाहीर.. हा विभाग ठरला अव्वल

0
 Maharashtra Board Class 10th (SSC) Result 2024  : दहावीच्या निकालाची विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत होते. शेवटी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपलीये. दहावीचा निकाल आज लागलाय. बोर्डाकडून विभागीय टक्केवारी दहावीच्या निकालाची जाहीर केलीये.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. मागील काही दिवसांपासून विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आज दहावीचा निकाल लागलाय. विशेष म्हणजे यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालीये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केलाय. विभागीय टक्केवारी देखील जाहीर करण्यात आलीये. यावेळी दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय. नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागलाय.

विशेष म्हणजे बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारलीये. मुलींच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. मुलांपेक्षा दहावीच्या निकालात मुलीच वरचढ ठरल्या आहेत. राज्याची दहावीच्या निकालाची टक्केवारी 95. 81 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाबद्दल सविस्तर माहिती दिलीये. मुलींचा निकाल 97.21 टक्के लागलाय. मुलांचा निकाल  94.56 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने अधिक आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्के लागला आहे.  सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्के आहे.

विभागनिहाय निकाल

पुणे – 96.44, नागपुर – 94.73, संभाजीनगर – 95.19, मुंबई – 95.83, कोल्हापूर – 97.45, अमरावती – 95.58, नाशिक – 95.28, लातूर – 95.27, कोकण – 99.01 याप्रमाणे विभागीय निकाल लागलाय. यामध्ये कोकण विभाग अव्वल ठरला असून सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय. विशेष म्हणजे कोकण विभागात अशी एकही शाळा नाही, जिचा निकाल झिरो टक्के आहे.

—————

उद्धव ठाकरेना शरद पवारांनी आमच्यापासून तोडले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे विधान चर्चेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे मित्र होते, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आमच्यापासून तोडले होते. हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा असे म्हणत अमित शहा यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते एका माध्यमाशी बोलत होते.

पुण्यात उत्पादन शुल्क विभागात रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंची धडक
पबमधील वसुलीची यादीच वाचली, 500 कोटींच्या वसुलीचा आरोप

पुण्यात उत्पादन शुल्क विभागात आमदार रवींद्र दांडेकर आणि सुषमा अंधारे यांनी आंदोलन करत अधिकाऱ्यांवर थेट आरोप केले आहेत. कोणत्या बार आणि पब मालकाकडून किती हप्ता दिला जातो तसेच कोणत्या अधिकाराला दिला जातो, पबमधील वसुलीची यादीच आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी वाचली. 500 कोटींच्या वसुलीचा आरोप त्यांनी यावेळी केला.

आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले
पुणे पोलिस आयुक्तांचे धक्कादायक खुलासे

पुणे हिट अँड रन प्रकरणात पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आणखी काही खळबळजनक खुलासे केले आहेत. धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने फेकून दिले, दुसऱ्याच तरुणाचे ब्लड सॅम्पल घेऊन रिपोर्ट बदलला अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. पुण्यात अल्पवयीन आरोपीने दोघांना धडक दिली. यात दोन निष्पाप तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल सापडलं की नाही, याबाबत सवाल उपस्थित केले जात होते. मात्र पबमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दारू पित असताना दिसत असला तरी रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल का आढळला नाही, यावरुन पुणे पोलीस संशयाच्या घेऱ्यात होते. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.

मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार
हॉटेलमध्ये झाडल्या तीन गोळ्या

मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर सोमवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर तीन गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे. गोळीबारात माजी महापौर मलिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
जळगावात वादळीवाऱ्यामुळे कोसळले घर

वादळीवाऱ्यामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक जळगावामध्ये घडली आहे. यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेत असलेल्या थोरपाणी पाड्यावरील ही घटना आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमध्ये दहा वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. पण त्याच्या डोक्यावरील आईवडिलांच्या मायेची सावली कायमची दुरावली आहे. रविवारी (26 मे 2024) संध्याकाळी यावल, चोपडा आणि सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्येही वादळीवाऱ्याचा तडाका बसला. वादळामुळे थोरपाणी आदिवासी पाड्यावरील मानसिंग गुना पावरा यांचे घर कोसळले. दुर्घटनेमध्ये मानसिंग गुना पावरासह ( वय 28 वर्ष), पत्नी सोनाबाई नानसिंग पावरा (वय 22 वर्ष), मुलगा रतिलाल नानसिंग पावरा (वय 3 वर्ष) आणि बाली नानसिंग पावरा (वय 2 वर्ष) अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

उष्माघाताने 1500 पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू
भंडाराच्या केसलवाडा येथील घटना
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. सूर्य आग ओकू लागला असताना उष्णतेचे प्रखर चटके बसत आहेत. अशात भंडाराच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा येथील बाबा पोल्ट्री फार्म केंद्रातील सुमारे 1531 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली. सध्या उष्णतेचा प्रचंड त्रास सुरू झाला आहे. माणसांबरोबरच प्राण्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. उष्णतेची प्रखरता सहन न झाल्याने कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामध्ये 1531 कोंबड्यांना जीव गमवावा लागला आहे. चार तासपर्यंत विद्युत पुरवठा बंद होता. त्यामुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुक्कुटपालक संचालकांकडून करण्यात आला आहे. तरी या प्रकरणात तपास सुरू आहे.