आई-वडिलांच्या स्मृतीनिमित्त अक्षय कुमारने राबविला हा उपक्रम

0
अभिनेता अक्षय कुमार यांनी त्यांचे दिवंगत वडील हरी ओम भाटिया आणि आई अरुणा भाटिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या झाडांचे रोपण केले. आयुक्त भूषण_गगराणी यांनी मुंबईकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत अभिनेता अक्षय कुमार आणि पालिका आयुक्त #भूषण_गगराणी यांच्या हस्ते आज बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली.
अक्षय कुमार यांनी नुकतेच त्यांच्या दिवंगत आई-वडिलांच्या स्मृतीनिमित्त एका वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन फाउंडेशन यांच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी अक्षय कुमार यांनी रोपांची लागवड करून नागरिकांना पर्यावरणाच्या जतनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत म्हटले की, “झाडे लावणे हे केवळ पर्यावरणासाठीच फायदेशीर नाही तर ते आपल्या जीवनात सकारात्मकता आणि आनंदही आणतात.”