महालक्ष्मी पुजनेला यावर्षी ४७ वे वर्ष साजरे

0

चंद्रपूर (Chandrapur) श्रीमती उषाताई साळुंके यांच्या कडील “महालक्ष्मी पुजनेला यावर्षी ४७ वे वर्ष साजरे करण्यात आले. यानिमित्त साळुंके परिवारानी सांस्कृतिक देखावे साजरे करुन उपस्थितांची वाहवा मिळवली .

यावर्षी “जगाचा अन्नदाता” म्हणजेच शेतकरी जिवनावर आधारीत देखावा दाखवण्यात आला . विदर्भातील शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या , नैसर्गिक दुष्काळ ,अवकाळी पाऊस यासारख्या ज्वलंत विषयावर देखावे दाखवून उपस्थितांचे लक्ष वेधण्यात आले. शेतकरी जगेल तरच आपण जगू हि भावना प्रत्येकाच्या मनात येत होती. कार्यक्रमा दरम्यान !!बळीराजाचा राज्य येऊ दे !! अश्या गर्जना देण्यात आल्या.

दुसऱ्या दृष्ट्यात “आठवणीतील गांव” या संकल्पनेवर आधारीत दृश्य साकारण्यात आले. या संकल्पनेतुन ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. १९१६ साली राष्ट्रपीता “महात्मा गांधी” यांनी ” खेड्याकडे चला ” ही चळवळ सुरू केली. “ग्रामीण भाग” हा देशाचा कणा असतो.

देशाच्या अर्थव्यवस्थेला ग्रामीण भागातील व्यवसायामुळे बळकटी मिळते. पण काळानूसार परिवर्तन होत असल्यामुळे ग्रामीण भागातील जनता शहराकडे आकर्षित होत आहे “खेडे” ओसाड पडत आहेत.

गावांकडे चला हा संदेश देऊन खेड्याची महत्ती सांगण्यात आली.या कार्यक्रमासाठी श्री सचिन साळुंके ,श्री धिरज साळुंके सौ.जयश्री जाधव,प्रतिक्षा उपाते जान्हवी जाधव यांनी विशेष मेहनत घेतली .